Sunday, August 12, 2018

Attachमेंट

#Documentary film shoot

मध्यंतरी एका डॉक्युमेंटरी फिल्म निमित्त बऱ्याच जागी फिरलो. त्यातला एक दिवस हे प्रेमी जोड दिसलं. इतरांशी सहज बोललो माहिती घेतली पण त्यांच्या बाबतीत त्यांना अडवलं किंवा विचारणं जमलं नाही.. त्यांना पाहून फक्त एक समाधान वाटत होत आणि त्याच्या एकत्रित पडलेल्या प्रत्येक पुढच्या पावलाला वाटत होत माझंही आयुष्य असंच सोबतीत जाईल ना???
ते एकमेकांना सावरत तिथून हळूहळू निघून गेले त्यांच्या कल्पनेत खूप लिहावं वाटलं पण नव्हतं जमत शेवटी ते जोडपं आणि सध्याची सत्य परिस्थिती यांचा संदर्भ कुठे तरी लागला आणि हा ब्लॉग पूर्ण झाला...
जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम केलंय तर नक्कीच वाचा आणि पुढेही पाठवा.

#jagadamb #jentertainment #rohanj



मी आता मनावर दगड ठेवलाय. मी त्याच्याशी बोलणारच नाही. का म्हणून सारखं मीच म्हणून नमतं घेऊ. नात्याची प्रेमाची गरज काय फक्त मलाच होती का?
आणि तो त्याला काहीच नकोय का? नावापुरती आहे का हे नातं? प्रेम करतो म्हणे?
प्रेम असत तर असा वागलाच नसता.
मी इतकं करून सुद्धा माझ्याशी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलला माझ्यावर हात उगारला...
नको आता असलं जबरदस्तीच नातं. पुरे झालं आता हे, आता हे थांबणार! मी संपवणार सगळं.

कालचा दिवस...

ती - रिंग वाजतेय, (मनात - किती फोन लावले हा उचलत का नाहीय, हल्ली खूप बदललाय हा... पूर्वी मिसकॉल जरी असला तरी धावत पळत यायचा आता फोन उचलायला ही टाइम नाहीय.)

तो - फोन कट करतो.

ती - रागावून फोन आपटते आणि कामात अडकवून घेते.
(तरीही पुन्हा सारखी त्याचीच आठवण)

तो - रात्री सगळं आटपून फोन करतो.

ती - (एकदा उचलत नाही दुसऱ्यांदा कट करते)

तो - text msg करतो. तू नक्की सिरीयस आहेस ना आपल्या रिलेशनशिपबद्दल. तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर??

ती - वाचते आणि थंड पडते... हा अस कस मलाच विचारतोय. चूक स्वतःची असून मला का बोलतोय. तिचा जीव कासावीस होतो आणि चटकन कॉल करते.

तो - मुद्दामच उचलत नव्हती ना? म आता का फोन केलास? की मी सोडून दुसरीकडे कुठे बीसी होतीस? माझं प्रेम कमी पडल का ग... (तो रागात बरच काही सुनवतो)

ती - (उदास होते, डोळे भरून येतात) हे तू म्हणतोयस. ज्याला स्वतःला माझ्यासाठी अजिबात वेळ नाही. एखादा फोन किंवा मेसेजवर तासभर बोलावं म्हटलं की तुझ्याकडे वेळ नसतो. सतत टाळणारा तू मलाच विचारतोय सिरीयस आहेस की नाही की मन भरलं सगळ करून आता...

तो - रागाने शिव्या देतो. भडकतो. रात्रभर दारू पितो. सकाळी तिचा न वाचलेला msg दिसतो. तू खूप बद्दललायस. (तिरस्कारी हास्याने तो खिडकीत उभा दात घासत असतो)
त्याची नजर घरा समोरच्या झाडावर जाते. चाफ्याच्या फुलांनी बहरलेल्या त्या झाडाकडे पाहून तो सगळं विसरून जातो आणि तिच्याबद्दल काही झाडाखाली बसून घालवलेले क्षण आणि आंबट गोड आठवणींनी हसू लागतो. नुकतंच आठ दहा महिन्यांचं गोड निरागस प्रेम होतं. मन जुळली आणि गुंतण झालं पण ही वेळ का आली त्याच त्यालाच कळलं नाही.
तो पुन्हा आठवणीतून बाहेर येत तोंड धुवून झाडाखाली बसलेल्या माळ्याकडे जातो.
बाबा आज झाडाला पाणी नाही घातलं?



बाबा - तुला कस माहीत मी याला खत पानी करतो ते.

तो - बाबा मी लहानपणापासुन तुम्हाला बघतो, रोज तुम्ही याला पाणी घालता न चुकता, काळजी घेता. खूप छान वाढवलायत हे झाड. पाहिलं तरी मन प्रसन्न होतं.

बाबा - त्याच्याकडे पाहून हसतात

तो - कायझालं बाबा हसताय का?

बाबा - काहिनाही बेटा! तुला आठवतंय का तू मला शेवटचं खत पाणी करताना कधी पाहिलंस. खर तर तुझ्या कामातून आणि रोजच्या धावपळीतुन तुला समजलंच नाही गेले 8-10 वर्ष मी या झाडाला खत पाणीच केलं नाही. कारण ते आता तितकं मोठं झालंय की त्याला आता रोज सांभाळण्याची गरज नाही. कारण योग्य वेळी मी त्याला त्याला हवं असलेल खत पाणी अन माझा वेळ देऊन त्याची निगा राखली आणि बघ आज ते इतकं बहरल आहे आणि छान फुल देऊन मला प्रसन्न तर करतच पण माझ्या म्हातारपणात आता माझा सोबती बनून मला साथ ही देत.

तो - म्हणजे बाबा तुम्ही पाणी न घालता हे जगतय? काही कळलं नाही.

बाबा - बेटा योग्य वेळी त्याला खत पाणी केल्याने आता त्याची मुळं इतकी मजबूत झालीयत की त्यांनी मातीशी आणि माझ्याशी नाळ जोडलीय. आता ते असच वाढत आणि बहरत जाईल. आता रोजच्या रोज त्याला मी गोंजारल नाही तरी त्याला जाण राहील आणि तो माझ्यावर अशीच माया राखील.
(बाबा उठून जाऊ लागले)

तो - (आयुष्याशी गोष्टींचा संदर्भ लावत, विचारात हरवून गेला)

बाबा - जाता जाता मागे फिरले आणि म्हटले, बेटा... नात्याचंही तसंच असतं. आणि निघून गेले.

तो - ???



या घटनेला आज 50 वर्षे लोटून गेली...
आज आमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव झाला.
त्या दिवशी तो इतका विचित्र वागला की मला आठ दहा महिन्यांचं कवळ नातं तुटल्यासारखं झालं... रात्रभर रडले आणि दुसऱ्यादिवशी तो घरी येऊन आई बाबसमोरून हाताला धरून घेऊन गेला जिथे त्याने मला प्रपोज केलं होतं. तिथेच तसाच गुडघ्यावर बसून त्याने माफी मागितली आणि घट्ट मिठी मारून रड रड रडला. त्या दिवसानंतर त्याने कधीच मला दुखावलं नाही. दोघांच्या प्रेमाचं खत पाणी आमच्या नात्याला इतकं मिळालं की वर्षभरात आम्ही लग्न केलं आणि आज आमची हाल्फ सेंच्युरी झाली.

आमचं हे नातं असच टिकून आहे आमच्या शेवटापर्यंत कारण त्याने माझी एकमेव इच्छा पूर्ण केली...

नको मला चंद्र नको मजला तारे,
हातात हात घेऊन सोबत शेवपर्यंत जगूया ना रे...

- रोh@nj