Monday, July 9, 2018

प्रवास

रात्रीची ११ ची वेळ. मुसळधार पाऊस. तो त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहोचला. मागे पाहिलं मनात पुटपुटला...
"पेहले मौत हमारे पीछे भागती थी, 
अब हम मौत के पीछे भागते है...
कमबख्त ऐट तो देखो उसकि,
अब गले भी नहीं लगाती..."


मुंबई. सर्वांना आपलं करणार शहर. पावसाचा मौसम. सकाळपासूनच जरा पावसाने जोर धरलेला. रविवारचा दिवस असल्याने सर्व कामे निवांत होती. छोटी मोठी हातासरशी आवरून त्याने निघायच ठरवलं. त्याला भर पावसात २५ किमी अनोळखी रस्ता कापायचा होता. प्रवास तसा जेमतेम तासाचा. पण पावसाने खुळंबा होणार हे निश्चित होत. ताशी ३०-४० च्या वर जाणं शक्य नव्हतं. घाई करणं ही चुकीचं होत. महत्वाची मिटिंग होती. आज काम पूर्ण होणं गरजेचचं होतं. गाडी सुरू झाली. पावसाच्या सरी इतक्या प्रेमाने समोर पडत होत्या की समोरची परकी गाडी तिच्या पुढे दिसत नव्हती. इतकं पांढर शुभ्र प्रेम पसरलं होत की फक्त तो अन् पावसाची सर. तिचे टिपूरे बरसणारे दाणे हेल्मेटच्या आत त्याच्या गालाना स्पर्शू लागले. सरीच्या इतक्या प्रेमाने त्याचे डोळे मिचकत होते. कारण आता सरी नेत्रांचेही चुंबन घेऊ लागल्या होत्या. तो पोहोचला. योजिले कार्य संपन्न झाले.
        आता तो निश्चिंत होता. कायतरी मनात बोचत होत. परिस्थितीने निडर झालेला अन् स्वभावाने शोधक असलेला तो कायतरी डोक्यात घोळत होत त्याच्या. पण विषय नेमका काय हे त्याच त्याला ही कळेना. संध्याकाळ झाली. ८ च्या सुमारास त्याने परतीचा प्रवास सुरु केला. पावसाच्या सरी तितक्याच प्रेमाने बरसत होत्या. आज दिवसभर त्यांचं प्रेम किंचितही कमी झाल्याचं जाणवलं नाही. सिग्नल लागला आणि "थोडक्यात वाचला रे"...


त्याच्या समोरच एक दुचाकीस्वार आडवा झाला. एक बाजूला गाडी दुसरीकडे तो फेकला गेला, रस्त्यात पडला असता तर...
नशिबानं बचावला. पुढ्यातला सारा प्रकार पाहून त्याचे तारे चमकले. "यस हेच ते", त्याला बोचनारा विषय सापडला. दररोज मुबईत कितीतरी अपघात होतात, त्याला जबाबदार कोण?
स्पीड, पाऊस की रस्ता...???

त्याला किक मिळाली, सिग्नलला उभा तो, दिवा हिरवा होण्याआधीच सुसाट सुटला, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला.
पाऊस तितकाच मुसळधार होता. वाटेवर अंधाराची चादर पसरली होती. रस्ता बऱ्यापैकी मोकळा होता. पण वाहनांची वर्दळ होतीच. आता तो ६०-८० च्या दसरम्याने गाडी उडवत होता. झोम्बणारा वारा... पावसाची बसणारी चपराक... अर्धा ओला तो... त्याला काहीच जाणवत नव्हतं. कारण तो घरच्या दिशेने नाही त्याला पडलेल्या प्रशाच्या दिशेने धावत होता...
        १०० मीटरच्या पुढची गाडी आणि रस्ताहि दिसणं कठीण होत. सगळा काळोख. रस्त्यावरील दिवे काही ठिकाणी निजले होते. पण गाड्यांच्या प्रकाशाने थोडं दिशा देता येत होती. आणि तितक्यात...........
त्याने क्लज-ब्रेक दोन्ही एकसाथ आवळले. पाय रस्त्यावर उतरवले. गाडी टोकाला येऊन थांबली. भर वेगातली गाडी आणि वेग कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न टोकाला येऊन यशस्वी झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. पण मागे पाहिलं तर दुसरी गाडी त्याच्या गाडीची गळाभेट घेऊन मोकळी झाली होती.
स्पीड टेस्ट कम्प्लिट...


हा अनुभव खिशात घेऊन तो पुढे निघाला.
तो पुन्हा धावू लागला. गाडीचा वेग तितकाच आणि पावसाचाही. आता पावसाशी लढत होती. आता अंग ही गारठल होतं. शरीर थोडं थकलं होतं पण डोकं त्याच शोधात. पाऊस आणि धुक्यात रस्ता हरवू लागला होता. आणि एका वळणदार वाटेवर..........
त्याचा श्वास फुलला. गाडी कशी बशी आवरली. पण जवळपास ती आडवी झालीच होती. गुडघा आपटला. तेवढ्यावर निभावल. कारण ओल्या रस्त्यावर वेगाने घेतलेली वळणदार वाट.. गाडी स्लिप झाली म्हणजे टायर अचानक फिरलं. सुदैवाने पूर्ण आडवा न होता त्याने गाडी कंट्रोल केली. पुन्हा सावरल. एक लांब श्वास घेतला. पुढल्या वाटेला लागला.

आता थोडा मार लागल्याने तो खचला होता. पण किरकोळ असल्याने ...तला किडा काही मेला नव्हता. तो पुन्हा वेगाला कापत निघाला. स्पीड आणि पावसासोबत जिंकल्याचा घमण्ड त्यात दिसत होता कदाचित. आता शेवटचा टप्पा होता. रस्ते.
पर शायद यहाँ उसके रास्ते लगने वाले थे...
‌तो आता अवघ्या १५-२० मिनिटांवर घरापासून लांब होता. थोडा जोशात होता. मनातली कोडी सोडवत असताना त्याला साऱ्याचा विसर पडला होता. बेभान होऊन तो रस्ता कापत होता आणि अचानक गाडी खाडकन खाली बसली... परत उडाली.. अडखळली.. वळाली.. लडखडली.. उजव्या बाजूने झुकली. तो वाकून चाकाकडे पाहून जरासा वर सरकला आणि १००च्या वेगाने आलेला ट्रक त्याच्या तोंडासमोरून जवळपास हेल्मेटला घासून त्याच्या दुचाकीचा आरसा फाटकन तोडून निघून गेला.
श्वासाचा वेग हजार पटीने वाढला. गाडी सोडून तो कडेला जाऊन उभा राहिला. सुन्न. काही कळत नव्हतं. या ५ सेकंदात काय घडलं काही समजलं नाही. पावसाच्या ओलाव्यात फटलेला घाम दिसत नसला तरी मनातली धडधड जाणीव करून देत होती. पहिल्या दोन वेळी मरण हुलकावणी देऊन गेलं. पण तिसऱ्या वेळी...
मौत छुके निकल गई थी!


पावसाचे शिंतोडे तोंडावर पडले. हरपलेली शुद्ध परतली. डोळ्यासमोर एक न दिसणारा खड्डा, त्यात अडकलेली गाडी, साचलेलं पाणी एवढचं दिसत होतं.
मागचा सारा प्रवास डोळ्यासमोर आला. वेगाबरोबर जिंकलेली शर्यंत, पावसाशी केलेले दोन हात... सगळं आता पावसाच्या पाण्यात वाहून गेलं.
तो स्थिरावला. घरी पोहोचलो. गाडी लावली.

रात्रीची ११ ची वेळ. मुसळधार पाऊस. तो त्याच्या गंतव्य ठिकाणी पोहोचला. मागे पाहिलं मनात पुटपुटला...
"पेहले मौत हमारे पीछे भागती थी,
अब हम मौत के पीछे भागते है...
कमबख्त ऐट तो देखो उसकि,
अब गले भी नहीं लगाती..."

तो गाडी लावून घरात निघाला आणि स्वतःला म्हटला.
किस्मत सबको ३ मौके नहीं देती..!!

When he started journey his speed was  between 60 to 80 kmph during heavy rain with the bad condition of roads.
But when he reached...
The condition of road, Force of rain...
And his speed was........................
U Decide Your Own Destiny!


जन हित में जारी... Drive Safely!!

- रोh@nj